1. आम्ही कोण
Find Abhyasika हे app विद्यार्थ्यांना अभ्यासिका शोधायला व जागा book करायला मदत करते. हे app Ritonyx Solutions (Jalgaon, Maharashtra 425001) चालवते. हे धोरण Digital Personal Data Protection Act 2023, IT Rules 2021 व Google Play धोरणांनुसार आहे.
Google Play वर हे app Spardha Pariksha Foundation किंवा Ritonyx Solutions यांच्या developer account वरून प्रकाशित होतं; ते Ritonyx Solutions बनवतात व चालवतात — सगळी माहिती व मदत Ritonyx Solutions कडेच.
2. आम्ही कोणती माहिती घेतो
- Mobile नंबर (OTP login साठी) व तुमचं नाव.
- तुम्ही केलेल्या जागेच्या booking, renewal व भेटीच्या विनंत्या.
- UPI ने पैसे भरल्याचा फोटो — फक्त ज्या अभ्यासिकेला पैसे दिले तिलाच दिसतो.
- तुम्ही स्वतः दिलेले reviews व rating.
- तुम्ही अभ्यासिका नोंदवली किंवा claim केली तर: तिची माहिती व फोटो, map pin (भरला तर) आणि मालकीच्या पुराव्याचा फोटो, जो फक्त आमची team तपासते.
- App version, फोनचा प्रकार व notification token — app नीट चालावं म्हणून.
3. Location
तुम्ही "Near me" दाबलं तरच फोनचं location घेतो — जवळच्या अभ्यासिका दाखवण्यासाठी. ते आमच्या server वर साठवत नाही आणि background मध्ये कधीच घेत नाही. तुम्ही अभ्यासिका नोंदवून location बटण दाबलं, तर तो map pin साठवला जातो आणि तुमच्या listing वर दिसतो.
4. माहिती कशासाठी वापरतो
- Login करणे व खातं सुरक्षित ठेवणे.
- अभ्यासिका शोधणे, जागा book करणे, फी व renewal ची आठवण.
- अभ्यासिकेला तुमच्याशी संपर्क करू देणे व सूचना (notifications) पाठवणे.
- फसवणूक व गैरवापर रोखणे.
5. माहिती कोणाला दिसते
आम्ही तुमची माहिती कधीच विकत नाही किंवा जाहिरातींसाठी देत नाही. App मध्ये जाहिराती नाहीत.
- फक्त तुम्ही book / संपर्क केलेल्या अभ्यासिकेला — तुमचं नाव, mobile व booking.
- आमचे सेवा-पुरवठादार (OTP साठी SMS, server hosting) — फक्त सेवा देण्यापुरतं.
- कायद्याने मागितल्यास सरकारी यंत्रणेला.
6. पैसे
फी तुम्ही थेट अभ्यासिकेला (UPI / रोख) देता. Find Abhyasika तुमचे पैसे घेत नाही आणि UPI PIN किंवा bank माहिती कधीच मागत नाही.
7. माहिती किती दिवस ठेवतो
खातं चालू असेपर्यंत. खातं delete केलं की लगेच काढतो. अभ्यासिकेने दिलेल्या पावत्या व प्रवेशाची नोंद कायद्यानुसार त्या अभ्यासिकेकडे राहते.
8. सुरक्षा
Mobile नंबर encrypted, सगळा संवाद HTTPS ने आणि फोटो खाजगी जागी ठेवतो. तरीही internet वर 100% सुरक्षेची हमी कोणीच देऊ शकत नाही.
9. वय
हे app 18 वर्षं व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमचं वय 18 पेक्षा कमी असेल तर कृपया हे app वापरू नका. Login करताना तुम्ही वयाची खात्री देता.
10. तुमचे हक्क
मृत्यू किंवा अक्षमतेच्या वेळी तुमचे हक्क वापरण्यासाठी एखादी व्यक्ती (nominee) नेमता येते: तिचं नाव व mobile नंबर आम्हाला लिहून कळवा.
तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे, संमती मागे घेणे आणि खातं कधीही delete करणे — Profile → Terms & privacy → Delete account, किंवा आम्हाला संपर्क करा.
11. बदल
हे धोरण बदललं तर वरची तारीख बदलू आणि app मध्ये कळवू.
12. Grievance Officer
Jivan Bharude (Grievance Officer / Manager) · info@ritonyx.in. तक्रार मिळाल्यावर 24 तासांत पोच व 15 दिवसांत उत्तर.
Contact us
Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001
info@ritonyx.in · 9903502121 · सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6