1. आम्ही कोण?
PRO-DeskBook ("Users Manager App") हे अभ्यासिका, मेस / डबा, हॉस्टेल / PG, जिम व क्लासेस चालवणाऱ्या मालकांसाठीचं app आहे. ते Ritonyx Solutions (Jalgaon, Maharashtra 425001) चालवतात.
तुमच्या सदस्यांची (विद्यार्थी / सदस्य / राहणारे) माहिती त्या-त्या व्यवसायाची (मालकाची) असते — Digital Personal Data Protection Act, 2023 नुसार मालक "Data Fiduciary" व आम्ही त्यांच्या वतीने माहिती सांभाळणारे "Data Processor" आहोत. मालकांची स्वतःची माहिती आमच्याकडे Data Fiduciary म्हणून असते.
Google Play वर Android app Spardha Pariksha Foundation किंवा Ritonyx Solutions यांच्या developer account वरून प्रकाशित होतं; ते Ritonyx Solutions बनवतात व चालवतात — सगळी माहिती व मदत Ritonyx Solutions कडेच.
2. कोणती माहिती ठेवतो?
- मालक / स्टाफ: नाव, मोबाईल नंबर, व्यवसायाचं नाव, शाखा, भूमिका (मालक / मॅनेजर / रिसेप्शन), पगार व हजेरी (मालकाने भरल्यास).
- सदस्य (सगळे व्यवसाय): नाव, मोबाईल, पालकांचा नंबर, लिंग, पत्ता, जन्मतारीख (ऐच्छिक), फोटो (ऐच्छिक), प्लॅन, फी, पावत्या, थकबाकी, deposit, हजेरीच्या वेळा.
- अभ्यासिका: सीट / शिफ्ट / लॉकर, कॉलेज / परीक्षा (ऐच्छिक).
- मेस: जेवणाची आवड (veg / non-veg / jain), जेवणाच्या नोंदी, "जेवण नको" दिवस, डब्याचा पत्ता व मार्ग.
- हॉस्टेल: खोली / bed, पालकांचं नाव, कायमचा पत्ता, व्यवसाय, ओळखपत्राचा क्रमांक (Aadhaar नाही; encrypted), पाहुणे व बाहेर-आत नोंदी, वीज मीटर, तक्रारी.
- जिम: Batch, वजन व शरीराची मापं, diet प्लॅन, Personal Training नोंदी, events.
- क्लासेस: Course / Batch, हप्ते, lecture हजेरी, चाचणी गुण.
- ऑनलाइन प्रवेश अर्ज व चौकशी: नाव, मोबाईल, कोणत्या प्लॅन / वेळेसाठी व कधीपासून.
- व्यवसायाचं ठिकाण (ऐच्छिक): व्यवसायाची नकाशावरची जागा — मालकाने app listing पानावर location चं बटण दाबलं तरच फोनवरून घेतली जाते.
- तांत्रिक: app आवृत्ती, device ओळख (login सुरक्षेसाठी), IP पत्ता, सुरक्षा नोंदी, app मधल्या त्रुटी (crash) व पानं उघडायला लागलेला वेळ — app सुधारण्यासाठी.
3. आम्ही काय कधीच घेत नाही
- कागदपत्रांचे फोटो / प्रती (Aadhaar, PAN वगैरे) — फक्त "कागद घेतले / बाकी" अशी खूण.
- बँक खातं, कार्ड किंवा UPI PIN — online पैसे Razorpay / Cashfree च्या सुरक्षित पानावर भरले जातात.
- तुमचे contacts, SMS, call logs, जाहिरात ID. तुमच्या location वर आम्ही लक्ष ठेवत नाही, background मध्ये तर कधीच नाही.
- App मध्ये जाहिराती किंवा जाहिरात / tracking SDK नाहीत.
- <strong>Aadhaar नंबर किंवा Aadhaar ची copy, बँक खाते क्रमांक, card नंबर, UPI PIN, password</strong> — आम्ही हे घेत नाही, साठवत नाही व पाहत नाही. App मध्ये असे नंबर लिहिताच येत नाहीत.
4. माहिती का वापरतो?
- प्रवेश, जागा / Batch, फी, पावत्या, थकबाकी, हजेरी, हिशोब व reports — तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी.
- OTP ने login, PIN lock व खात्याची सुरक्षा.
- पावती, फीची आठवण, गैरहजेरी असे कामाचे संदेश (WhatsApp / SMS) — मालकाने चालू केले तरच.
- तुमच्या subscription चा हिशोब व मदत (support).
- App मधल्या त्रुटी शोधणे व वेग सुधारणे.
- कायद्याने बंधनकारक नोंदी ठेवणे.
5. App च्या परवानग्या (Android / Windows)
- Internet — server शी जोडायला.
- Notifications — थकबाकी, सूचना, दिवस-बंद अशा आठवणी दाखवायला (तुम्ही बंद करू शकता).
- फोटो निवड — सदस्याचा फोटो लावताना फक्त तुम्ही निवडलेला एक फोटो (system picker); Windows वर webcam फक्त फोटो काढताना.
- Phone सुरू झाल्यावर आठवणी पुन्हा लावणे (boot) — बाकी काहीच नाही.
6. माहिती कोणाला दिसते / कोणाकडे जाते?
- सदस्याची माहिती फक्त त्या व्यवसायाचे मालक व त्यांनी जोडलेला स्टाफ (त्यांच्या भूमिकेनुसार) पाहू शकतात — दुसऱ्या व्यवसायाला कधीच नाही.
- Meta (WhatsApp Business Cloud API) व SMS कंपनी — संदेश पाठवण्यासाठी फक्त फोन नंबर व संदेशाचा मजकूर.
- Email सेवा — सूचना / backup ची माहिती पाठवण्यासाठी.
- Razorpay / Cashfree — subscription चे online पैसे (आम्हाला फक्त payment ID व रक्कम मिळते).
- Hosting कंपनी (VPS hosting provider) व encrypted backup साठी cloud storage — फक्त साठवणूक.
- Google Drive (मालकाने Google account जोडला तरच): encrypted backup फाइल मालकाच्या स्वतःच्या Drive मधल्या app च्या वेगळ्या जागेत जाते. आम्हाला फक्त त्या जागेची व जोडलेल्या Gmail पत्त्याची परवानगी असते — मालकाच्या Drive मधल्या इतर फाइल्स, फोटो किंवा Gmail संदेश आम्हाला दिसत नाहीत. हे फक्त backup ठेवण्यासाठी व restore साठी वापरलं जातं, जाहिरातींसाठी कधीच नाही. मालक जोडणी कधीही काढू शकतो व ते backups पुसू शकतो. Google APIs कडून मिळालेल्या माहितीचा वापर व हस्तांतरण Google API Services User Data Policy नुसार (Limited Use अटींसह) होतो.
- कायद्याने मागितल्यास सरकारी यंत्रणा.
- आम्ही माहिती कोणालाही विकत नाही, जाहिरात कंपन्यांना देत नाही.
- RITONYX ची अधिकृत support team — सेवा सुरळीत चालावी, तांत्रिक अडचणी सोडवता याव्यात व सुरक्षित backup ठेवता यावा यासाठी खात्यातील माहिती हाताळू व सांभाळू शकते; इतर कोणत्याही कारणासाठी नाही.
- सदस्यांना आम्ही कधीही थेट जाहिरात संदेश पाठवत नाही.
7. सुरक्षा
- फोन नंबर, जन्मतारीख, ओळखपत्र क्रमांक database मध्ये encrypted.
- सगळं connection HTTPS (TLS); app प्रत्येक request वर सही करतं.
- App उघडताना PIN; नवीन device वर OTP; ठराविक दिवसांनी पुन्हा खात्री.
- स्टाफला फक्त त्याच्या भूमिकेइतकाच access; प्रत्येक बदलाची audit नोंद.
- रोज encrypted backup.
- सुरक्षेत गडबड (data breach) झाल्यास कायद्यानुसार संबंधितांना व Data Protection Board ला कळवतो.
8. माहिती किती काळ ठेवतो?
- खातं चालू असेपर्यंत.
- प्लॅन संपल्यावर 1 वर्ष माहिती app / software मध्ये दिसते — renew केल्यावर लगेच सगळी.
- त्यानंतर माहिती app मधून काढून सुरक्षित (encrypted) archive मध्ये कायद्याने आवश्यक तेवढे दिवस, जास्तीत जास्त 6 वर्षं ठेवतो; या काळात परत आल्यास विनंतीवर परत मिळते. नंतर कायमची पुसतो.
- पुसण्याची विनंती आल्यावर 30 दिवसांत app मधून काढतो; पैशांच्या नोंदी कायद्याने 6 वर्षं सुरक्षित archive मध्ये, नंतर पुसतो.
- रोजच्या backup मधल्या प्रती 90 दिवसांनी आपोआप पुसल्या जातात.
9. तुमचे हक्क
DPDP Act, 2023 नुसार: तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे, पुसायला सांगणे, संमती मागे घेणे, तक्रार करणे व तुमच्या वतीने एखादी व्यक्ती नेमणे (nominee).
मालक: app मधून माहिती दुरुस्त / Export करा; खातं पुसायला "Data पुसणे" पान वापरा. सदस्य: आधी तुमच्या व्यवसायाशी (मालकाशी) बोला, किंवा "Data पुसणे" पानावरून थेट विनंती करा.
10. 18 वर्षांखालील सदस्य
App फक्त व्यवसाय मालक व त्यांचा स्टाफ (18+) वापरतात. 18 वर्षांखालील सदस्याची माहिती घेताना पालकांची संमती घेणं ही मालकाची जबाबदारी आहे.
11. बदल
हे धोरण बदललं तर या पानावरची तारीख बदलते; मोठे बदल app मध्ये कळवतो.
12. तक्रार अधिकारी (Grievance Officer)
Jivan Bharude (Grievance Officer / Manager) · info@ritonyx.in · 9903502121. तक्रारीची पोच 24 तासांत व निवारण 15 दिवसांत (IT Rules, 2011 व DPDP Act, 2023 नुसार).
📞 आमच्याशी बोला
Ritonyx Solutions · Jalgaon, Maharashtra 425001
🕘 वेळ: सोम–शनि, सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6